काका-पुतण्यावरुन रामदास कदम यांना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर !

काका-पुतण्यावरुन रामदास कदम यांना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर !

मुंबई – प्लास्टिक बंदीवरुन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरे यांना पुतण्याची इतकी भीती वाटू लागली का? असा सवाल केला होता. त्यावर आज राज ठाकरे यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं असून रामदास कदम यांनी नात्यांमध्ये वाद निर्माण करु नये, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच हा माणूस इवलीशी बुद्धी असणारा आहे. मुळात सांगकाम्यांना यामधील काही कळणार नाही. माझा प्रश्न हा सरकारशी संबंधित आहे. नात्यांशी नाही. कदमांनी नात्यांमध्ये वाद निर्माण करू नये. प्लास्टिक बंदीचा निर्यण त्यांनी घेतला तर त्यावर बोलावे. निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे सरकारने त्यावर बोलावे. विनाकारण दुसरीकडे विषय नेऊ नये, अशी टीका त्यांनी रामदास कदम यांच्यावर राज ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान चांगल्या निर्णयाला विरोधाची भूमिका निषेधार्ह आहे.” विरोधकांनी प्लॅस्टिकला पर्याय आणि दंडाच्या रकमेबाबत पत्रकबाजी केली. मातोश्रीवर बॅनरबाजी करण्यात आली. राज ठाकरेंना पुतण्याची इतकी भीती वाटू लागली का?  राज ठाकरे बहुधा कधी बाजारात गेले नसावेत. त्यामुळे कशावर व कधीपासून बंदी याची कल्पना नसावी. एक मुलगा चांगला निर्णय घेतोय (आदित्य) त्याचे कौतुक करा. उगाच विरोध का करत आहात. असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

COMMENTS