अमित शाहांची ‘बकेट लिस्ट’ राज ठाकरेंचं बोलकं व्यंगचित्र !

अमित शाहांची ‘बकेट लिस्ट’ राज ठाकरेंचं बोलकं व्यंगचित्र !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्रात त्यांनी  भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर मार्मिक भाष्य केलं आहे. याला अमित शाहांची ‘बकेट लिस्ट’ असं हेडींग दिलं आहे. मुंबई दौऱ्यात अमित शाहांनी माधुरी दीक्षितचीही भेट घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे बोलकं व्यंगचित्र काढलं आहे.

संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत अमित शाह विविध मान्यवरांना भेटत आहेत. राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून अमित शाहांची संपर्क फॉर समर्थन अभियानातली ‘बकेट लिस्ट’ दाखवली असून यामध्ये माधुरी, लतादीदी कपिल देव, मिल्खासिंग तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही नाव काढलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरलं झालं असून या व्यंगचित्राबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS