राजस्थान विधानसभा निवडणूक, भाजपला आणखी एक धक्का !

राजस्थान विधानसभा निवडणूक, भाजपला आणखी एक धक्का !

नवी दिल्ली – राजस्थानमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या सात डिसेंबररोजी याठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापत असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी असलेल्या भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. भाजपचे नेते हनुमान बेनिवाल यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे राज्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

पक्षातील बडे प्रस्थ मानले जाणारे घनश्याम तिवारी यांनी भारत वाहिनी पक्ष स्थापन करुन सर्वांत आधी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यानंतर भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेले जसवंतसिह यांचे पुत्र आमदार मानवेंद्रसिंह यांनी राजेंच्या एकछत्री कारभाराला कंटाळून भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा भाजपचा मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची पक्षावर मजबूत पकड असल्याचं गेली पाच वर्षांपासून पहावयास मिळत आहे. परंतु त्यांच्या एकछत्री कारभारावर अनेक मंत्री नाराज आहेत. परंतु आमदारांचा मोठा गट त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचाशिवाय भाजपला सध्या तरी पर्याय नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत वसुंधराराजे बंडखोरीचा सामना करत आपली जादू कायम कशी टीकवणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS