राजस्थानात यांच्या चमकदार कामगिरीमुळे काँग्रेसचा विजय!

राजस्थानात यांच्या चमकदार कामगिरीमुळे काँग्रेसचा विजय!

मुंबई – राजस्थानात काँग्रेसनं चमकदार कामगिरी केली आहे. याचं श्रेय  काँग्रेसचा युवा चेहरा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना जातं. पायलट.यांच्या नेतृत्वात पक्षाने राजस्थानात चमकदार कामगिरी बजावली आहे. सत्तास्थापन करतानाच सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातही विजय मिळवला आहे.

मुस्लिमबहुल टोंक मतदारसंघातील दोन्ही मुस्लिम उमेदवारांना पायलट यांना धोबीपछाड देता आलं. मुस्लिम कार्ड खेळत भाजपने युनूस खान यांना सचिन पायलट यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, तर बसपतर्फे मोहम्मद अली उमेदवार होते.
टोंक या विधानसभा क्षेत्रात जवळपास 50 हजार मुस्लिम मतदार आहेत. ही काँग्रेसची व्होट बँक मानली जाते. याशिवाय 30 हजार गुर्जर, 35 हजार एससी आणि 15 हजार माळी समाजाचे मतदार आहेत.

COMMENTS