राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच अर्ज, निवडणूक बिनविरोध होणार !

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच अर्ज, निवडणूक बिनविरोध होणार !

मुंबई – राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 23 तारखेला मतदान होणार आहे. मात्र या सहा जागांसाठी आतापर्यंत सहाच उमेदवार जाहीर झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. सर्वच पक्षांनी त्यांच्या आमदारांच्या सख्यांच्यानुसार जेवढे उमेदवार विजयी होतील तेवढेच उमेदवार दिले आहेत. अजूनतरी जास्तीची उमेदवारी पुढे आलेली नाही. त्यामुळे यामध्ये काही बदल झाला नाही तर निवडणूक बिनविरोध होईल. भाजपकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही भाजपकडू उमेदवारी जाहीर झाली आहे. तर केरळ भाजपचे अध्यक्ष व्ही मुरलीधरन यांना महाराष्ट्रातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपचे तीनच उमेदवार निवडूण येऊ शकतात आणि त्यांनी तीनच उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेसाठी काल अचानक वेगळचं नाव जाहीर करण्यात आलं. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, रत्नाकर महाजन, मिलिंद देवरा या नावांची चर्चा होती. मात्र अचानकपणे कुमार केतकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रावादी काँग्रेसने यापूर्वीच वंदना चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेनंही अनिल देसाई यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकी एकच उमेदवार दिलेला आहे.

COMMENTS