त्यांचा खेळ होतो, शेतक-यांचा मात्र जीव जातो – राजू शेट्टी

त्यांचा खेळ होतो, शेतक-यांचा मात्र जीव जातो – राजू शेट्टी

मुंबई – यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु हवामान खात्याचा हा अंदाज सपशेल खोटा ठरला असल्याचं दिसत आहे. हवामान खात्याच्या या फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. हे जमत नसेल तर त्याऐवजी भविष्यवाणी करणा-यांकडून अंदाज सांगावा. यांचा खेळ होतो मात्र शेतक-यांचा जीव जातो अशी जोरदार टीका शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे राज्यातील शेतक-यांनी मोठ्या जोमाने पेरणी केली. परंतु मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये गेली अनेक दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे.  त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. हजारो रुपये खर्च करुन बी बियाणे खरेदी केली. परंतु आता पावसानेच दांडी मारल्यामुळे बी बियाणांचा खर्चही मिळेल की नाही अशी चिंता आता शेतक-यांना खात आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून हवामान विभागावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

COMMENTS