राजू शेट्टींना मोठा धक्का, स्वाभिमानीचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

राजू शेट्टींना मोठा धक्का, स्वाभिमानीचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना आघाडीच्या जागावाटपामुळे इच्छा असूनही लढण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना विधानसभेचं आश्वासन दिल्याचं बोललं गेलं. मात्र आताही त्यांना कोणताही मतदारसंघ सोडला जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तुपकर हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान यापूर्वी सदाभाऊ खोत हे भाजपसोबत गेल्यामुळे शेट्टी यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविकांत तुपकर हे राजू शेट्टींची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राजू शेट्टी हे तुपकर यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS