शेतकय्रांना कर्जमाफी कधी मिळणार?, राजू शेट्टी म्हणतात…VIDEO

शेतकय्रांना कर्जमाफी कधी मिळणार?, राजू शेट्टी म्हणतात…VIDEO

उस्मानाबाद – सावरकरांच्या प्रश्नापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्‍न अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शहरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि इतर पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये आता राजू शेट्टींची भर पडली असून त्यांनी सावरकरांच्या प्रश्नापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह अल्प दराने वीज पुरवठा या मुद्याला महत्त्व आहे.

त्यामुळे सावरकर यांच्या विषयावर वाद घालण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊन ते सोडवणे गरजेचे असल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले. जिल्हाप्रमुख रवींद्र इंगळे, तानाजी पाटील यावेळी उपस्थित होते.

COMMENTS