इतका यु टर्न बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला शोभत नाही – राजू शेट्टी

इतका यु टर्न बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला शोभत नाही – राजू शेट्टी

सांगली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. मोदी यांच्या समोर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत राहिली नाही, उद्धव ठाकरे यांची अगोदरची भाषणं त्यांनी परत स्वतः ऐकावीत, आत्ता मात्र भाजपा शिवसेना एकत्र आली आहे, इतका यु टर्न बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला शोभत नसल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त सांडणाऱ्या नतद्रष्टांना पुन्हा का संधी द्यायची, आंदोलनं करून काही तरी मिळविण्याची नाटकं आणि थेरं आम्ही करीत नाही. आम्ही थेट प्रश्‍न सोडविण्यावर भर देतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. त्यानंतर शेट्टी यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

तसेच शरद पवार हे मंत्री असताना आम्ही ज्या प्रश्नासाठी बोलत होतो, टीका करत होतो, मात्र ते प्रश्न पवार साहेबांच्यामुळे सुटत होते, आत्ता मात्र तशी परिस्थिती नव्हती असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS