आशिष शेलार व टोळक्याची अवस्था भ्रमिष्टासारखी – राजू शेट्टी

आशिष शेलार व टोळक्याची अवस्था भ्रमिष्टासारखी – राजू शेट्टी

मुंबई –  अरे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने भांडतोय. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणून भांडतोय तुम्ही मात्र शेतकऱ्यांची लूट करताय. त्यांच्या ध्यानी मनी फक्त आणि फक्त सत्ता दिसते. सत्ता हातातून निसटल्यामुळे आशिष शेलार व त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावर टिका केली आहे.

सांगली येथे गुरुवारी भाजपच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ झाला. या प्रसंगी उपस्थित भाजपचे नेते आशिष शेलार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख पिंजरा चित्रपटातील ‘मास्तर’ असा केला. विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे  घेण्याची वेळ आली आहे, अशी टिका राजू शेट्टी यांच्यावर केली होती.

त्यास प्रतित्तुर देताना राजू शेटी यांनी आशिष शेलार यांचा समाचार घेतला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी शरद पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होत या प्रश्नाचे उत्तर आधी द्या, असे सुनावले

COMMENTS