‘रामा’ची जादू लोकसभेच्या मैदानात चालणार का ?, काँग्रेसमधून लढवणार निवडणूक ?

‘रामा’ची जादू लोकसभेच्या मैदानात चालणार का ?, काँग्रेसमधून लढवणार निवडणूक ?

नवी दिल्ली – ९० च्या दशकातील ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत प्रभूरामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार असून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात गोविल उतरणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बैठकीमध्ये इंदूरच्या जागेसाठी अरुण गोविल यांच्या नावाचा विचार झाला असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

दरम्यान गोविल यांना इंदूरमधून उमेदवारी दिली तर त्यांचा सामना थेट लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याशी होणार आहे. भोपाळ आणि इंदूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांनी नेहमीच भाजपाला साथ दिली असून मागच्या तीस वर्षात काँग्रेसला इथे एकदाही लोकसभेची निवडणूक जिंकता आलेली नाही. परंतु आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मध्य प्रदेशमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे 30 वर्षांचा इतिहास बदलण्यासाठी गोविल रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे गोविल यांची जादू राजकारणाच्या मैदानात चालणार का हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS