विखे यांना घेऊन फायदा नाही तोटा झाला  – राम शिंदे

विखे यांना घेऊन फायदा नाही तोटा झाला – राम शिंदे

नाशिक – भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ओबीसींची पक्षातील अंतर्गत धुसफूस ही भाजप सरकार स्थापन झाले असते तर बाहेर आली नसती असं म्हणत राम शिंदे यांनी आशिष शेलार यांच्या व्यक्तव्याला दुजोरा दिला आहे. तसेच राम शिंदे यांनी राघाकृष्ण विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सहकार्य केलं नसल्याचा आरोप केला आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

चार भिंतीच्या आत बोललं जातं आहे. पक्षातील काही लोकांनी सहकार्य केलं नाही, विरोधी भूमिका घेतली. इनकमिंगचा फायदा झाला नाही. चर्चा सुरू आहे मी पुरावे दिले आहेत. नगरमधील जागा कमी झाल्या त्यामुळे विखे यांना घेऊन फायदा नाही तोटा झाला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. निवडणुकीच्या आधी घेतलेले निर्णय चांगले होते, मात्र नंतर घात आणि संधीसाधूंमुळे हे घडलं म्हणून चर्चा असल्याचंही शिंदे म्हणाले आहेत.

COMMENTS