सरकार स्थापन करण्याबाबत शरद पवारांनी आठवलेंना दिला ‘हा’ सल्ला!

सरकार स्थापन करण्याबाबत शरद पवारांनी आठवलेंना दिला ‘हा’ सल्ला!

मुंबई –  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आठवले यांनी सरकार स्थापन करण्याबाबत परांना सल्ला विचारला. यावेळी पवारांनी सेना-भाजपनेच सरकार स्थापन करायला हवं असं आठवलेंना सांगितलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती दुरुस्त व्हावी, एवढ्या मोठ्या राज्यात इतके दिवस सरकार नाही, हे योग्य नाही. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या जीवनावर होईल. याची चिंता आठवलेंनाही आहे. त्यामुळे ते सल्ला विचारण्यासाठी आले होते. आमच्या दोघांचं एकमत आहे, की या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं आहे.

त्यामुळे त्यांनी लवकर सरकार बनवावं. महाराष्ट्रात स्थिरता येईल याची काळजी त्यांनी घ्यावी. असं माझं मत मी आठवलेंना सांगितलं. त्यांचंही तेच आहे. त्या दृष्टीने त्यांनी अधिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS