उदयनराजेंना रामदास आठवलेंची खुली ऑफर !

उदयनराजेंना रामदास आठवलेंची खुली ऑफर !

सातारा – केंद्रीय मंत्री व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सातार्‍याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना खुली ऑफर दिली आहे. सातारा दौ-यावर असताना आठवले यांनी उदयनराजेंना रिपाइंत प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली असून उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिकीट देणार नसल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी आपल्या पक्षात यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच जाहीर कार्यक्रमात आठवले यांनी उदयनराजेंचे कौतुकही केलं आहे.

दरम्यान पंचवार्षिक निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत रिपाइंच्या वाट्याला होता. त्यावेळी रिपाइंच्या उमेदवाराच्या पळवापळवीवरून निवडणूक गाजली होती. पुढे उदयनराजे, अशोक गायकवाड व पुरूषोत्तम जाधव यांच्यात लढत झाली. त्यात राष्ट्रवादीच्या तिकिटावरील उदयनराजे मोठ्या फरकाने निवडून आले होते. आताही राष्ट्रवादी उदयनराजेंनाच तिकिट देईल अशी परिस्थिती आहे. पंरतु याबाबत अजून कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मतदारसंघात संभ्रमावस्था पहावयास मिळत आहे.

COMMENTS