आठवले गटाची विचारविनिमय बैठक !

आठवले गटाची विचारविनिमय बैठक !

मुंबई :  भीमा कोरेगावमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयनं बैठक घेण्याचं ठरवलं आहे. येत्या ६ जानेवारीला आठवले गटाची विचारविनिमय बैठक पार पडणार आहे. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी करुन दाखवल्यानंतर त्यांची ताकद वाढत असल्याची कुजबूज आरपीयामध्ये सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

भीमा कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आरपीयानं कोणतीच भूमिका घेतली नसल्यामुळे दलित कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील आरपीआयच्या कार्यकारिणीनं राजीनामा दिला आहे. त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. परंतु आम्ही सुरूवातीपासून अत्याचारग्रस्तांच्या बाजूनं आहोत. त्यामुळं याचा फटका आमच्या पक्षाला बसणार नाही, असं आठवले गटाचे ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर यांनी सांगितले.

COMMENTS