प्लास्टिक बंदीबाबत रामदास कदम यांची मोठी घोषणा !

प्लास्टिक बंदीबाबत रामदास कदम यांची मोठी घोषणा !

मुंबई  प्लास्टिक बंदीबाबत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मोठी घोषणा केली असून त्यांच्या या निर्णयामुळे छोट्या दुकानदारकांना दिलासा मिळाला आहे. किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे किराणा दुकानदारांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

दरम्यान मसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकेजिंगवरची बंदी उठवण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली आहे. त्यामुळे ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे किरकोळ दुकानदारांनाही दिलासा मिळाला आहे. तसेच ग्राहकांना प्लास्टिक पिशवी वापरण्यासाठी बंदी असून किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याच रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

अटी-शर्तींसह बंदी उठवण्यात येणार

किरकोळ दुकानदारांनी आणि उत्पादकांनी उत्पादीत प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारण्याची अट

पॅकेजिंगवर उत्पादकाचं नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापण्याची अट

उत्पादकांनी रिसायकल प्लांट्स आणि कलेक्शन सेंटर्स उभारण्याची अट

 

 

COMMENTS