नंतर फक्त नाटक सुरु होते, रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट !

नंतर फक्त नाटक सुरु होते, रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट !

जालना – केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती. नंतर फक्त नाटक सुरु होते, असं दानवे यांनी म्हटलं आहे. आज जालना येथे रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात छत्तीसचा आकडा पहायला मिळाला. अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालनाच्या जागेवर दावा केला होता. दानवेंना जालन्यात अस्मान दाखवू असा निश्चय खोतकरांनी केला होता. पंरतु युतीनंतर ही जागा भाजपला मिळाली. तरीही खोतकरांनी दानवेंविरोधात लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता. मात्र युतीनंतर त्यांची दिलजमाई झाली होती. परंतु अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती.असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS