राज्यातील शिवसेनेचं सरकार फारकाळ टीकणार नाही – दानवे

राज्यातील शिवसेनेचं सरकार फारकाळ टीकणार नाही – दानवे

लातूर – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील शिवसेनेचं सरकार फारकाळ टीकणार नाही. शिवसेना दडपणाखाली काम करत आहे. तसेच शिवसेनेच्या वाघाची आता शेळी झाली असल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे. सरकार बदललं म्हणून त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणावर होणार नाही. लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी होत असून भाजपच्या ताब्यात लातूरची जिल्हा परिषद राहिल असा दावाही त्यांनी केला आहे. लातूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

दरम्यान नुकतंच लातूर महानगरपालिकेत भाजपला फटका बसला आहे. लातूर महानगरपालिका पूर्वी भाजपच्या ताब्यात असताना काँग्रेसने भाजपचे काही नगरसेवक फोडून सत्ता काबीज केली आहे. परंतु लातूरची जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यातच राहिल असा दावा दानवे यांनी केला आहे.

COMMENTS