विधानसभेला भाजप-सेनेची युती होणार का?,  कसा ठरला फॉर्म्युला?, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया !

विधानसभेला भाजप-सेनेची युती होणार का?, कसा ठरला फॉर्म्युला?, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया !

पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री
रावसाहेब दानवे यांनी आज पिंपरी चिंचवडचा दौरा केला आहे. यावेळी रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करत राहा, संधी मिळेल असं आश्वासन दिलं आहे. तसेच विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती राहणार आहे, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच हवा असं वक्तव्य अमित शाहांनी केलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सेना आणि भाजपची युती राहणार आहे, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ज्या पद्धतीने काम केले त्याच पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करा असं आवाहन दानवे यांनी केलं आहे.

तसेच विधानसभेला भाजप-सेनेची युती होणार आहे. 50 – 50 टक्के जागांचा फॉर्म्युला पक्का असून मुख्यमंत्री पदाची चर्चा प्रसार माध्यमात पसरवली गेली असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आगामी काळात देशात काँग्रेस राहणार नाही. भाजप वाढत चालला असून काँग्रेसची मुक्ततेकडे वाटचाल सुरु असल्याची टीकाही दानवे यांनी केली आहे.

COMMENTS