“रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने कोट्यवधींचा घोटाळा !”

“रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने कोट्यवधींचा घोटाळा !”

जालना – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आशिर्वादाने कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  भोकरदन तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामात हा घोटाळा झाला असून यामध्ये कोट्यवधी रुपये रावसाहेब दानवे यांनी हडपले असल्याचं राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना हाताशी धरुन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घोटाळा केला असल्याचंही चंद्रकांत दानवे यांनी म्हटलं आहे.

माजी आमदार चंद्रकांत दानवे

दरम्यान रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चंद्राकांत दानवे यांनी केली असून त्यांना मदत करणा-या अधिका-यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु रोजगार हमी योजनेत नक्की घोटाळा झाला आहे किंवा नाही हे चौकशीनंतरच समजणार आहे.

COMMENTS