युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा – रावसाहेब दानवे

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा – रावसाहेब दानवे

जालना – आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती व्हावी अशी इच्छा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसेच शिवसेना आणि भाजपची युती होणार असून पुन्हा मीच जालन्याचा खासदार होणार असल्याचा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे. सर्व मतदारसंघात फिरत असून प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्याची इच्छा ही युती व्हावी अशी असल्याचं दानवे यांनी म्हंटलं आहे.जालन्यातील दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी

दरम्यान युती झाली तर जालना लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेन दावा केला आहे. त्यामुळे यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं एकला चलोची हाक दिली आहे. तरीही भाजपकडून शिवसेनेला युतीसाठी गोंजारण्याचं काम अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS