आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोध – आठवले

आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोध – आठवले

कोल्हापूर – तुम्ही जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो. आज आमच्या जातींवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे जातीच्या आधारवरच आरक्षण असलेच पाहिजे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे. पण आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोध आहे. सगळंच आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नसल्याने जातीच्या आधारावरच आरक्षण असावे. असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सर्वोच्च न्यायालय मराठा समाजाचा विचार करेल, अशी आशा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र कॅटेगरी करावी, सगळा मराठा समाज श्रीमंत नाही. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. प्रत्येक जातीची जनगणना होणे गरजेचे आहे. कोणत्या जातीचा किती टक्का आहे, हे आता समजत नाही. २०२१ ची जनगणना जात निहाय होण्यासाठी पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले

COMMENTS