“मोहन भागवत यांच्यावर मकोका लावा !”

“मोहन भागवत यांच्यावर मकोका लावा !”

मुंबई – भारिप बहुजन महासंघ पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर आंदोलन कऱण्यात आले. ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे अनेक शस्त्र आहेत. तसेच आरएसएसला शस्त्राची काय गरज आहे? ही शस्त्र जप्त करण्यात यावीत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवणाऱ्या संघाकडे भारतीय सैन्याच्या तोडीचे हत्यारबंद सैन्य कसे काय ? सत्ता जायची दिसल्यास उद्या हीच हत्यार पोलिसांवर उगारली जाणार का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान शस्त्र बाळगल्याप्रकरणी मोहन भागवत यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. तसेच यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवरही जोरदार टीका केली आहे.

COMMENTS