कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा अपमान केला – सचिन सावंत

कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा अपमान केला – सचिन सावंत

मुंबई – अभिनेत्री कंगना रणौतचा बोलविता धनी हा भाजप पक्ष असून भाजपचा कंगनाला पाठिंबा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. कंगनानं केलेल्या वक्तव्यावर भाजपनं मौन बाळगलं आहे. त्यावरुन भाजप कंगनाला पाठिंबा देत असल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे.

कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजपा करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने  मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. यानंतर कंगनानंही संजय राऊत यांनी ‘मला मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचा,’ गंभीर आरोप केला.

संजय राऊत यांनी मला जाहीर धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असं धमकावलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहिर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

यावरुनच भाजपानं पुन्हा एकदा संजय राऊत यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेत्यानं पुन्हा एकदा निंदनीय विधान केलं आहे. महाविकास आघाडीनं मुंबई पोलिसांवर स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव आणला आहे. जेणेकरून सुशांतला न्याय मिळू नये. त्यांचा उद्देशच बॉलिवूड ड्रग माफियांना संरक्षण देण्याचा आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच कंगना राणौत झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही,’ असं देखील राम कदम यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजपा करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

COMMENTS