भाजपा नेत्यांवरील ये डाग अच्छे नहीं, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया!

भाजपा नेत्यांवरील ये डाग अच्छे नहीं, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया!

मुंबई – एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाथाभाऊंनी त्यांच्याकडे असलेले भाजपाच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडिओ क्लीप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत. त्यांच्या गप्प राहण्यामुळे भाजपाच्या माध्यमातून जनहितविरोधी व ज्यांचे चरित्र संशयास्पद आहे असे नेतृत्व जनतेवर लादले जात असेल तर ते उचित नाही असं सावंत यांनी म्हटलं आहे.

तसेच खडसे साहेब, भाजपाच्या घरातील धुण्यांमध्ये अनेक धुणी डाग पडलेली आहेत. फडणवीस साहेब क्लीनचीट देऊन सर्व ड्रायक्लीन करुन टाकतात. देशहितासाठी आपल्या कडील सर्व व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत. जनतेला ठरवू द्या ड्रायक्लीन करायचे की विल्हेवाट लावायची! भाजपा नेत्यांवरील ये डाग अच्छे नहीं! असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.

COMMENTS