वाकला कणा, मोडला बाणा म्हणे मला वाघ म्हणा – सचिन सावंत

वाकला कणा, मोडला बाणा म्हणे मला वाघ म्हणा – सचिन सावंत

मुंबई – काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शिवसेना-भाजप युतीवर जोरदार टीका केली आहे. वाकला कणा, मोडला बाणा म्हणे मला वाघ म्हणा असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. अफजल खानाशी युती करत असतील तर आज शिवजयंतीच्या दिवशी महाराजांनी काय शिक्षा केली असती ? असा सवाल सावंत यांनी केला आहे.

दरम्यान शिवसेनेला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, महाराजांचे नाव घेऊन एवढी लाचारी स्वीकारली. आमच्या दृष्टीने युती झाली हे चांगले झाले. मोदी समर्थक आणि मोदी विरोधकांचा पुढचा सामना आहे, यात मोदी विरोधकांचा मुखवटा गळून पडला असल्याची टीकाही सचिन सावंत यांनी केली आहे. पापाचा घडा या दोघांचा भरला आहे, शिवसेनाही या पापात सहभागी असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS