राष्ट्रवादीकडून सचिन तेंडूलकर लोकसभेच्या मैदानात?

राष्ट्रवादीकडून सचिन तेंडूलकर लोकसभेच्या मैदानात?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवास्थानी जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात असून या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकरला राष्ट्रवादीकडून लोकसभेची ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सचिनही राष्टेरवादीत प्रवेश करु शकतो असं बोललं जात आहे. परंतु सचिननं जरा राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्याला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

COMMENTS