पांढ-या दुधातील काळे बोके कोण आहेत हे शेतक-यांना समजेल – सदाभाऊ खोत

पांढ-या दुधातील काळे बोके कोण आहेत हे शेतक-यांना समजेल – सदाभाऊ खोत

सांगली – दुध दरवाढीवरुन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दुध संघांना इशारा दिला असून शेतक-यांना जर दुधाला 28 रुपये दर दिला नाही तर सरकारच्या तिजोरीवर तुम्ही डल्ला मारताय हे स्पष्ट होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. असं असेल तर मी दुध दरात तीन रुपये कपात करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सांगलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान सरकारने दुधाला दिलेल्या 5 रुपयांच्या दरवाढीच्या निमित्ताने पांढ-या दुधातील हे काळे बोके कोण आहेत. हे सांगली आणि कोल्हापूरमधील शेतक-यांना समजणार असल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला आहे. तसेच सरकारकडे पाच रुपये दरवाढ तुमचा तोटा भरून काढण्यासाठी मागितली आहे की शेतक-यांसाठी मागितली आहे असा सवालही यावेळी खोत यांनी केला आहे.

COMMENTS