तेव्हा तुम्ही मसनात गेले होते काय? सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका !

तेव्हा तुम्ही मसनात गेले होते काय? सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका !

वर्धा – कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्ष पुरावरुन राजकारण करत असून पूर आला तेव्हा मसनात गेले होते काय? असा सवाल खोत यांनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यांना फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची असून कोरडी सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांना पुराशी काही देणं घेणं नाही. राष्ट्रवादीचे नेते मदत करत नसून फक्त लोकांची डोकी भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते वर्धा येथील कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान तुम्हाला शेतकऱ्यांचा इतकाच पुळका असता तर मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला नसता. तेव्हा शेतकऱ्यांवरचं तुमचं प्रेम कुठे गेलं होतं ?, तसेच २००५ मध्ये महापूर आला होता, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत होती. मग तेव्हा तुम्ही पर्यायी व्यवस्थेवर काम का केलं नाही? असा सवालही खोत यांनी केला आहे. त्यामुळे खोत यांच्या आरोपांना आता राष्ट्रवादी काय प्रत्युत्तर देणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS