दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करा – संभाजी ब्रिगेड

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करा – संभाजी ब्रिगेड

पुणे – दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात जादुटोण्यामुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. ही घटना मोठी धक्कादायक असल्यामुळे या रुग्णालयावर कारवाई करुन रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आज धर्मादाय सह आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या मागण्या

१) दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करावा. कारण एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे. म्हणून संबंधितांवर कारवाई करावी. या आगोदरही असे प्रकार घडले असल्याची शक्यता आहे. तसेच डॉ. सतीश चव्हाण या डॉ. क्टर’ने महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क ‘मंत्रतंत्राचा वापर केला’ हे स्पष्ट झाले. मात्र या भोंदूगिरीत रूग्ण महिलेचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय धक्कादायक असून दुर्दैवाने या बनावट भोंदूगिरीत विवाहितेला जिव गमवावा लागला.

२) राज्य सरकारने रूग्णालयास मिळणारे सर्व शासकीय अनुदान बंद करावे.

३) मृत सौ. सोनवणे यांच्या मुलांना पालकत्व म्हणून रूग्णालयाने ५० लाख रूपये तातडीने मदत करावी.

४) पुणे शहर व जिल्ह्यात सर्व रूग्णालयात अशासकीय सदस्यांची तातडीने नियुक्ती करून त्यांना हक्क अधिकार द्यावेत. हे प्रतिष्ठित हॉस्पिटल समस्या व तक्रारींचा अड्डा आहे.

५) ‘हत्येसह अंधश्रध्दा पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करावे.’ व या प्रकरणातील विकृत चेहरा समोर आणावा.

COMMENTS