मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या – संभाजी ब्रिगेड

मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या – संभाजी ब्रिगेड

मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाईत शत्रूला पराजीत केलं. स्वराज्याच्या क्रांतीची ज्योत छत्रपती संभाजी महाराजांनी पेटत ठेवली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्य जगभर पोहचले. प्रकांडपंडीत व चारित्र्यसंपन्न शंभूराजे उत्तम साहित्यिक होते. त्यांचे आठ भाषांवर प्रभुत्व होते म्हणून त्यांनी… बुधभुषण, नायीकाभेद, सातसतक व नखशीख हे उत्तम ग्रंथ लिहिले. परंतु हा इतिहास काही साहित्यिकांनी दडपून ठेवला. म्हणून छत्रपती संभाजी राजेंचा संपुर्ण खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे… यासाठी इतिहासाचे पुर्नलेखन झाले पाहिजे. तसेच मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी महाराजांच्या 361 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल उत्सवाच्या रूपाने मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी कैलास वडघुले यांच्यावतीने संभाजी महाराज लिखित बुधभूषण ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच या प्रसंगी मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे असा ठराव संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. या ठरावीची प्रत माननीय मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ, मराठा सेवा संघाचे कैलास वडघुले, जयकर कदम, अजय पवार, मयूर शिरोळे, पुजा झोळे, सुजय कदम, दत्तात्रय खुटवड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सौरभ भिलारे व सचिन जोशी यांनी केले.

COMMENTS