शिवसेनेत प्रवेश करणार का?, समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया! VIDEO

मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत समीर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून या बातम्यात तथ्य नाही, आम्ही मीडियातुनच हे ऐकतोय. आम्ही राष्ट्रवादी सोबत आहोत राष्ट्रवादीचं काम करत आहोत. चॅनल टीआरपीसाठी वेगवेगळ्या बातम्या देत आहेत. भुजबळ साहेबांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून मुंबईत आलो आहोत असं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS