सांगली- भाजप नेत्याचं भाजप खासदारालाच ओपन चॅलेंज, “निवडणुकीच्या रिंगणात आपला सामना नक्की होणार !”

सांगली- भाजप नेत्याचं भाजप खासदारालाच ओपन चॅलेंज, “निवडणुकीच्या रिंगणात आपला सामना नक्की होणार !”

सांगली – सांगलीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून भाजप नेत्यानच भाजपच्या खासदाराला ओपन चॅलेंज केलं आहे. त्यामुळे सांगलीतील वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपात राहून राष्ट्रवादीच काम करतात, भाजपला ब्लॅकमेलिंग करतात. मंत्री पद संभाळण्याइतकी लायकी आणि कुवत नसल्याची जोरदार टीका पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान खासदार संजय काका यांनीच अभ्यासू असे आमदार शिवाजीराव नाईक आणि आमदार सुरेश खाडे यांचं मंत्रीपद कापलं असल्याचा आरोप पडळकर यांनी केला असून ते भाजपाचं मोठ नुकसान केलं असून माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, निवडणुकीच्या रिंगणात आपला सामना नक्की होणार आहे असल्याचं भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय काका यांना म्हटलं आहे.

COMMENTS