सांगली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे निधन !

सांगली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे निधन !

सांगली – सांगलीतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विलासरावजी शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आष्ठा येथील घरी त्यांचं निधन झाले. विलासरावजी शिंदे हे एकदा (1978 ला) वाळवा विधानसभा आणि एकदा (2004 ला) सांगली-सातारा विधानपरिषद मतदार संघाचे आमदार होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

COMMENTS