काँग्रेस, राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक भाजपच्या वाटेवर, आघाडीचे संकेत मिळू लागल्याने नगरसेवकांत अस्वस्थता !

काँग्रेस, राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक भाजपच्या वाटेवर, आघाडीचे संकेत मिळू लागल्याने नगरसेवकांत अस्वस्थता !

सांगली – सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच, आघाडीच्य काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास उमेदवारीचा गुंता वाढणार आहे. त्यामुळे काहीजणांनी भाजपशी संपर्क वाढविला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत.

स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने या नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घडवून आणली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले असले तरी, अद्याप सांगली महापालिकेवर मात्र झेंडा फडकविता आलेला नाही. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला आहे. यंदा भाजपने महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्धरित्या भाजपची वाटचाल सुरू आहे. मात्र आघाडीच्या उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास भाजपमधील निष्ठावंत गट नाराज होण्याची शक्यता आहे.

सांगली महापालिकेतील सध्याचे बलाबल

एकूण – 78 नगरसेवक

1) काँग्रेस – 42 नगरसेवक

2) राष्ट्रवादी – 25 नगरसेवक

3) स्वाभिमानी आघाडी – 10 नगरसेवक

भाजपा, आर पी आय आणि अपक्ष अशी स्वाभिमानी आघाडी

4) मनसे – 1

COMMENTS