सांगलीमध्ये पहिला निकाल आघाडीच्या बाजूने, जळगावमध्ये शिवेसना भाजपमध्ये चुरस !

सांगलीमध्ये पहिला निकाल आघाडीच्या बाजूने, जळगावमध्ये शिवेसना भाजपमध्ये चुरस !

सांगली महापालिकेच्या निवडणुकीत पहिला निकाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजुने लागला आहे. एका प्रभागातीली चारही जागा आघाडीने जिंकल्या आहेत. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रासला 1 जागा मिळाली आहे. तर आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी 8 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या कलानुसार सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं दिसून येत आहे.

दुसरीकडे जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेनेत जोरदार चुरस पहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानसुरा भाजप 30 जागांवर तर शिवेसनेला 22 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना तिथे अजून खातंही उघडता आलेलं नाही.

COMMENTS