सांगलीत मोठी राजकीय घडामोड, संभाजी भिडेंचा शिवसेनेला पाठिंबा ?

सांगलीत मोठी राजकीय घडामोड, संभाजी भिडेंचा शिवसेनेला पाठिंबा ?

सांगली – सांगली महापालिकेची या महिन्यात निवडणूक होत आहे. भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी जोर लावलाय. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शिवेसना नेत्यांची सांगलीमध्ये भेट घेतली. संभाजी भिडे, शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्यात बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. सांगलीतल्या अमराई क्लबमध्ये ही चर्चा झाली. या भेटीचं कारण समजू शकलं नसलं तरी निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

या बंदखोलीमधील बैठकीबाबत शिवसेना नेते किंवा संभाजी भिडे यांच्याकडून जाहीरपणे काही प्रतिक्रिया येते का ते पहावं लागेल. मात्र तसं झालं नाही तर अंतर्गतपणे संभाजी भिडे हे शिवसेनेला अंतर्गत पाठिंबा देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भिडे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकार यांच्यावर नाराज आहेत. विविध प्रसंगी शिवसेनेनं संभाजी भिडे यांची पाठराखण केली आहे. त्यामुळेच त्याची परतफेड म्हणून भिडे हे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. भिडे यांनी शिवसेनेला उघड किंवा छुपा पाठिंबा दिला तर हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडण्याचा शक्यता आहे. त्याचा थेट फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS