मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय काकडेंचा मोठा निर्णय!

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय काकडेंचा मोठा निर्णय!

मुंबई – गेली काही दिवसांपासून भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच संजय काकडे यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीनंतर काकडे यांनी मोठा निर्णय घेतला असून ‘माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री कायम राहणार आहे. माझे मन इथे रमले नाही म्हणून मी काँग्रेसमध्ये जात असून मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली असल्याचं काकडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जावून मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेत होती. दरम्यान भाजपा प्रदेश आणि स्थानिक कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला असून ‘मी काँग्रेसमध्ये जातोय हेच सांगण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमची मैत्री कायम राहणार आहे’,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे राज्यसभा खासदार होण्यापूर्वी पासून मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर पक्षाच्या अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या. असल्याचंही काकडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS