ब्रेकिंग न्यूज, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट!

ब्रेकिंग न्यूज, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट!

मुंबई – राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी आपल्यासमोर आली आहे. ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली आहे. सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रँड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली. दुपारी दीड ते साडे तीन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीनं हे वृत्त दिलं असून संजय राऊत यांनी मात्र या भेटीबाबत बोलणं टाळलं आहे.

दरम्यान संजय राऊत आणि फडणवीस यांच्यातील भेट ही राज्यातील राजकीय विषयावर झाली असल्याचं बोललं जात आहे. तसेच पुढील काही दिवसातच फडणवीस यांची सामनावर मुलाखत घेतली जाणार असून त्यावरही चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तूर्तास तरी ही भेट प्राथमिक स्तरावर होती तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.

COMMENTS