अयोध्येतील राम मंदिरावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी केलं ‘हे’ ट्वीट!

मुंबई – अयोध्येतील राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टानं आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला आहे. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनू ट्वीट केलं आहे. यामध्ये संजय राऊत यांनी पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार… जय श्रीराम!!!, असं ट्विट केलं आहे.

COMMENTS