असे मजकूर रंग मारुन मिटवता येतील पण लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळ झालंय – संजय राऊत

असे मजकूर रंग मारुन मिटवता येतील पण लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळ झालंय – संजय राऊत

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरजार टीका केली आहे. वर्षा बंगल्याच्या खोलीतील भिंतीवर मजकूर लिहिल्या प्रकरणी त्यांनी ही टीका केली आहे. असे मजकूर रंग मारुन मिटवता येतील. पण लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळं झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या खोलीतील भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह लिहिल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राऊत यांनी ही टीका केली आहे.

वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा UT असा संक्षिप्त उल्लेख करून लिखाण करण्यात आले आहे. त्यावर राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. वर्षा बंगल्याच्या भिंतीवर नेमकं काय लिहिलंय, हे मला माहीत नाही. असे मजकूर रंग मारून मिटवताही येत नाहीत. या निमित्ताने मी एवढेच म्हणेन की, असं ज्यांनी लिहिलेय त्यांचे तोंड मात्र आज काळे झाले आहे, अशा शब्दांत राऊत यांनी निशाणा साधला.

मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागला. या बंगल्याचा ताबा अद्याप नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नाही. दरम्यान, बंगल्याच्या पाहणीदरम्यान एका खोलीच्या भिंतीवर आढळलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळेच नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा मजकूर देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजाने लिहिला असावा, अशी चर्चा होती. मात्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत त्याचा इन्कार केला आहे. ‘साधारण १५ दिवसांपूर्वीच आम्ही वर्षा बंगला सोडला. त्यावेळी कोपरा न् कोपरा पाहिला होता. तेव्हा असे काहीही लिहिलेलं आढळले नव्हते. दिविजाने तर असे काही लिहिण्याचा प्रश्नच नाही. यावरून होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही यावर आक्षेप घेतला. अशा प्रकारचे व्यक्तिगत लिखाण वर्षा या शासकीय निवासस्थानाच्या भिंतीवर करणे योग्य नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर टीका करत कुणाच्यातरी मनातील द्वेष यातून बाहेर आल्याचे वक्तव्य केले आहे.

COMMENTS