सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार ?

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार ?

मुंबई – भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उमदयनराजे भोसले यांनी विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण होणार नसल्याची चर्चा होती. परंतु उदयनराजेंची ही मागणी आता पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे. कारण विधानसभेसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती आहे. आज याबाबतची अधिसूचना निघणार असून आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन आज दुपारी एक वाजता निघणार असल्याची माहिती आहे. विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध उदयनराजे असा सामना ससाताय्रात पहायला मिळणार आहे.

दरम्यान दोन दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत साताऱ्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. पण, आता आज याचे नोटिफिकेशन काढून विधानसभेसोबतच ही निवडणूक होणार असल्याचं दिसत आहे.त्यामुळे आता राष्ट्रवादी उदयनराजे यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी देणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS