हर्षवर्धन पाटील यांना संधीसाधूपणा आला – सत्यजीत तांबे

हर्षवर्धन पाटील यांना संधीसाधूपणा आला – सत्यजीत तांबे

पुणे – “इंदापूर तालुक्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे नाव आजही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नेता आदराने घेतो. पुणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पुढच्या पिढ्यांत तो विचार राहिला नाही किंबहुना संधीसाधूपणा आला. खरं तर शंकरराव पाटलांचा काँग्रेसी विचार त्यांच्या वारसांनी नाही तर इंदापुरच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जपला”, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली होती. इंदापूर येथील युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सत्यजीत तांबे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील सोशल मिडियावरून प्रतित्तुर दिले.

“युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती. तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत, असा अंकिता पाटील यांनी सल्ला दिला.

COMMENTS