शिवसेनेला जोरदार धक्का, उपजिल्हाप्रमुखाचा उद्धव ठाकरेंकडे राजीनामा !

शिवसेनेला जोरदार धक्का, उपजिल्हाप्रमुखाचा उद्धव ठाकरेंकडे राजीनामा !

चंद्रपूर – जिल्ह्यात शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षात मान न मिळाल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जोरगेवार यांच्या राजीनाम्यामुळे जोरदार धक्का बसला आहे.

दरम्यान किशोर जोरगेवार हे गेले काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तसेच काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी खर्गे यांच्याशी त्यांनी प्रवेशाबाबत  चर्चा केली असल्याची माहिती असून ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान भाजपमधे नाराज असलेल्या जोरगेवार यांनी विधानसभा निवडणुकीवेळी  शिवसेनेत प्रवेश घेतला होता. या निवडणुकीत त्यांनी द्वितीय क्रमांकाची 50 हजार मतं घेत भाजपला जोरदार टक्कर दिली होती.

COMMENTS