महाविकासआघाडीचं खातेवाटप,  कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं?, वाचा सविस्तर!

महाविकासआघाडीचं खातेवाटप, कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं?, वाचा सविस्तर!

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक 2 मंत्रीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे सहा नेते शपथ घेणार आहेत.  शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे दोन मंत्री उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील. तर उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी राजभवनमध्ये 1 डिसेंबरला होणार आहे.

दरम्यान तिन्ही पक्षातील खाते वाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह नगरविकास, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, उद्योग, एमएसआरडीसी, संसदीय कामकाज, उत्पादन शुल्क आणि जीएसटी, परिवहन, शालेय शिक्षण तर काँग्रेसकडे कृषी, महसूल, महिला आणि बाल कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा, उच्च शिक्षण, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा तर
राष्ट्रवादीकडे गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, सहकार, वैद्यकीय शिक्षण, जलसंधारण, पर्यटन, ग्रामविकास खातं असणार आहे.

COMMENTS