मोदी सरकारचं परिवर्तन करणार – शरद पवार

मोदी सरकारचं परिवर्तन करणार – शरद पवार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली ही महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या महारॅलीत बावीस पक्ष सहभागी झाले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी शरद पवार यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आम्ही एकत्र आलो आहोत आज तुम्हाला या मंचावरून वचन देतो की देशात जे मोदी सरकार आहे त्याचं परिवर्तन करणार. देशात सत्ताबदल होणे आवश्यक असल्याचही पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेऊन संपूर्ण देशातील सामान्य जनतेला त्रास दिला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं आहे. छोटे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचमुळे या मोदी सरकारला हटवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच आगामी काळाच सत्ताबदल होणारच असल्याचा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS