आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा, शेतक-याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले…

आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा, शेतक-याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले…

बीड – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौ-यावर आहेत. आज शरद पवार यांनी नवगण राजुरी येथील शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे यांचा संदर्भ देत एका शेतक-यानं आमच्या धनुभाऊला मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. यावर बाजूलाच बसलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे पाहूण शरद पवार यांनी स्मितहास्य करुन धनंजयला मुख्यमंत्री करुन टाकू असं म्हणाले.

बीड जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. याठिकाणी शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे याठिकाणच्या शेतक-यांना मदत करण्याचं आश्वासन शरद पवार यांनी दिलं आहे. जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी 30 टँकर देणार असून टँकरचे भाडे आणि इंधनाचा सर्व खर्च पक्ष करणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच यंदाच्या हंगामात चाललेल्या साखरकारखाना चालकांची बैठक घेऊन जिल्ह्यासाठी दुष्काळी मदत देण्याचे आवाहनही करणार असल्याचंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS