शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोघांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण !

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोघांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली असून भेटीचा तपशिल मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.तसेच नागपूर मेट्रो आणि पालखी मार्गाच्या कामातासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान ही राजकीय चर्चा किंवा गुप्त भेट वगैरे असं काही नसल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु या दोघांमध्ये झालेल्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच विविध तर्कवितर्कही लढविले जात आहेत. आगामी काळातील निवडणुकांबाबत ही राजकीय चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु नागपूर मेट्रो आणि पालखी मार्गाच्या कामातासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

COMMENTS