यापुढे मला असं बोलू नका, शरद पवारांची अमरसिंह पंडित यांना ताकीद !

यापुढे मला असं बोलू नका, शरद पवारांची अमरसिंह पंडित यांना ताकीद !

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांना ताकीद दिली आहे. तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात या वयातही शरद पवार इतकं फिरतात. मी काय म्हातारा झालोय का?, मला यापुढे असं बोलायचं नाही असं शरद पवार यांनी अमरसिंह पंडित यांना म्हणताच सभेत एकच हशा पिकला असल्याचं पहावयास मिळाले.

दरम्यान महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आष्टी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शरद पवा यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्यष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. यावळी पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

COMMENTS