पाकवरील हल्ल्याचे श्रेय सैन्याला, राजकारणासाठी वापर करु नये – शरद पवार

पाकवरील हल्ल्याचे श्रेय सैन्याला, राजकारणासाठी वापर करु नये – शरद पवार

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकला आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही माहिती आहे. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सैन्य दलाचा प्रत्येकाला अभिमान वाटावा असे शौर्य यांच्यात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सैन्य दलात अस्वस्थता होती, मला खात्री होती ज्यांनी हे केले त्यांना भोगावे लागेल.

तसेच हवाई दलाने हल्ला करताना हा हल्ला आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधात जाऊ नये याची काळजी घेतली. पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी अड्डे आहेत, त्यान्नी पुलवामात हल्ला केला होता. त्यामुळे त्यांना धडा शिकवायचे काम हवाई दलाने केले असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच हल्ला करताना सामान्य माणसाला त्रास न देण्याची भूमिका सैन्यानं घेतली आहे. पाकिस्तानची सीमा न ओलांडता आंतरराष्ट्रीय स्तरावर काही अडचण होणार नाही याची काळजी घेतली.  हवाई दलाचे अभिनंदन, देशाला सार्थ अभिमान आहे. माझं वैयक्तिक मत आहे की आपण पाकिस्तानात गेलो नाही सीमा ओलांडली नाही. त्यामुळे पाकिस्तानने जर याचे उत्तर दिले तर दहशतवाद्यांना पाकिस्तानचा आश्रय आहे हे सिद्ध होईल.

आतापर्यंत या देशात असे प्रकार झाले पण त्यांचे श्रेय सैन्याला दिले गेले, त्याचे राजकारण कधी केले नाही. आता याचे श्रेय मोदीला देत असतील तर भागवतांनाही द्यायला हवे. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही, पण कुणी आमच्या वाट्याला गेले तर आम्ही सोडत नाही हे देशाने पूर्वीही दाखवले आहे. पूर्वी असा प्रयत्न झाला होता तेव्हा इंदिरा गांधींनी तर त्या देशाचा भूगोल बदलला होता.  हा प्रश्न राजकीय करायचा नाही सर्व देशाने सरकारच्या मागे उभे रहायचे असे सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते, आता कुणी त्याचा राजकीय कारणासाठी वापर करत असेल तर ते योग्य नाही असंही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS